नवी दिल्ली : 2020 च्या दिल्ली दंगलीचा आरोपी उमर खालिदला न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. उमर खालिदला दोन आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. 2020 च्या दिल्ली दंगलीपासून तो सतत तुरुंगात होता, मात्र आता नुकत्याच आलेल्या न्यायालयाच्या निर्णयानंतर तो काही काळासाठी तुरुंगातून बाहेर येऊ शकणार आहे.
दिल्लीच्या एका ट्रायल कोर्टाने उमर खालिदला त्याच्या बहिणीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. 16 डिसेंबर ते 29 डिसेंबर या दोन आठवड्यांसाठी त्यांची जामिनावर सुटका होणार आहे.
20,000 खाजगी जातमुचलक्यावर आणि विविध अटींसह जामीन मंजूर केला
अतिरिक्त सत्र न्यायाधीश (एएसजे) समीर बाजपेयी यांनी आदेश देताना सांगितले की, उमर खालिद 16 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत जामिनावर असेल. न्यायालयाने म्हटले:
“विवाह याचिकाकर्त्याच्या बहिणीचा असल्याने, अर्जास अनुमती आहे आणि याचिकाकर्त्याला 16.12.2025 ते 29.12.2025 पर्यंत रु. 20 हजारांचे खाजगी जातमुचलक आणि खालील अटींसह समान रकमेच्या दोन जामीन भरून अंतरिम जामीन मंजूर केला जातो.”
![]()
