नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अडवाणी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दोन्ही नेत्यांमधील भेटीचे फोटोही समोर आले आहेत. अडवाणी आज ९८ वर्षांचे झाले आहेत.
तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टद्वारे अडवाणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी लिहिले की, अडवाणीजी हे एक विचारी आणि दूरदृष्टीचे राजकारणी आहेत ज्यांची देशासाठीची सेवा अविस्मरणीय आहे.
शनिवारी पंतप्रधान मोदींनी अडवाणींच्या घरी जाऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन भेट दिली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ आनंददायी संवाद झाला.
![]()
