नांदेड | दिनांक : 21-12-2025
नांदेड जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकांच्या निकालात भारतीय जनता पार्टी ने ऐतिहासिक यश संपादन करत ३ नगरपरिषदा व ७४ नगरसेवक विजयी करून आपली मजबूत पकड सिद्ध केली आहे. या दणदणीत विजयाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ८ चे इच्छुक उमेदवार श्री. प्रशांत गड्डम यांनी आपल्या कार्यालयात विजयाचा आनंदोत्सव उत्साहात साजरा केला.
या आनंदोत्सवात परिसरातील सर्व समाजातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री. प्रशांत गड्डम यांनी फटाक्यांची आतषबाजी करत उपस्थित युवकांना मिठाई वाटप केले. तसेच सामाजिक एकोपा, एकता व सकारात्मकतेचा संदेश देत सर्व युवकांना हिरवे, निळे व केशरी रंगाचे रुमाल भेट स्वरूपात प्रदान केले.
यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत श्री. प्रशांत गड्डम यांनी या विजयाचे श्रेय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व नांदेडचे खासदार मा. अशोकराव चव्हाण, भोकर विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मा. श्रीजया चव्हाण, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा. अमर राजूरकर तसेच पक्षाचे महामंत्री मा. संजय कोडगे यांना दिले.
त्यांनी सांगितले की, “माननीय नेत्यांचे मार्गदर्शन, कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम आणि जनतेचा विश्वास यामुळेच हा ऐतिहासिक विजय शक्य झाला आहे. आगामी काळात नांदेड जिल्ह्यात विकास, सुशासन आणि सर्वसमावेशक राजकारणासाठी भारतीय जनता पार्टी अधिक जोमाने कार्य करेल.”
![]()



