हैदराबाद 17 नोव्हेंबर. हैदराबादच्या विद्या नगर येथील कुटुंबातील 18 जणांचा सौदी अरेबियात एका भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाला. सौदी अरेबियात सोमवारी सकाळी झालेल्या या अपघातात एकूण 45 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
तेलंगणा हज समितीने एका निवेदनात म्हटले आहे की, सर्व मृत लोक हैदराबादचे आहेत. मृतांमध्ये 17 पुरुष, 18 महिला आणि 10 लहान मुलांचा समावेश आहे. हे सर्व लोक चार वेगवेगळ्या ट्रॅव्हल एजन्सींच्या माध्यमातून ९ डिसेंबरला हैदराबादहून उमराहला निघाले होते.
मक्केत कर्तव्य बजावल्यानंतर मदिना येथे जात असताना हा हृदयद्रावक अपघात झाला. मदिनापासून सुमारे 25 किमी अंतरावर त्यांची बस डिझेल टँकरला धडकली.
![]()
