नांदेड, 26 फेब्रुवारी : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावी (कर्नाटक) येथे डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्स (DSC) NCO भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 16 मार्च 2026 पासून रेजिमेंटल सेंटर येथे भरती मेळा सुरू होईल, ज्यामध्ये मराठा लाईट इन्फंट्री रेग्युलर टेरिटोरियल आर्मी माजी सैनिकांना DSC मध्ये शिपाई (GD) आणि लिपिक या पदांवर पुन्हा नोंदणी करण्याची संधी मिळेल.
निवडलेल्या माजी सैनिकांना विहित मार्गदर्शक तत्त्वांनुसार सामायिक शारीरिक चाचणी (CPT) द्यावी लागेल, जी भारतीय सैन्याच्या नियमांनुसार घेतली जाईल. डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्समध्ये वयानुसार पुन्हा नावनोंदणीसाठी ही चाचणी अनिवार्य असेल.
रॅलीदरम्यान उमेदवारांना त्यांचा लढाऊ ड्रेस आणि डीएमएस आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व इच्छुक माजी सैनिकांनी नियोजित तारखेला बेळगाव येथे वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किरण आंबेकर यांनी केले आहे.
![]()
