यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र काँग्रेसतर्फे त्यांना आदरांजली
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी आदरांजलीने साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष सचिन नाईक गणेश पाटील, नामदेव चव्हाण, दत्ता नांदे, श्री रंग बर्गे, मिलिंद केसरकर, जमीनदार यादव, बच्चर सिंग, संजय गावकर, मुनाफ हकीम आदींची उपस्थिती होती. सर्व नेत्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांची दूरदृष्टी, नेतृत्व आणि पुरोगामी विचार आजही महाराष्ट्र व देशासाठी दीपस्तंभ असल्याचे सांगितले.
यावेळी नेत्यांनी त्यांच्या विकास विचार आणि जनसेवेला सलाम करत त्यांनी सांगितलेल्या मार्गावर पुढे जाण्याचा काँग्रेस पक्षाचा निर्धार असल्याचे सांगितले.
![]()
