ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट उपमुख्यमंत्री ई. कानाथ शिंदे यांचा निर्णय – 24 हजार 500 रुपये सानुग्रह अनुदान मंजूर

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट उपमुख्यमंत्री ई. कानाथ शिंदे यांचा निर्णय – 24 हजार 500 रुपये सानुग्रह अनुदान मंजूर

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय – 24 हजार 500 रुपये सानुग्रह अनुदान मंजूर

ठाणे (आफताब शेख) – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदाच्या दिवाळीनिमित्त ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना 24,500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांना देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे ठाणे महापालिकेच्या 9 हजार 221 कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदाने उजळून निघाली आहे.

गतवर्षी कर्मचाऱ्यांना २४ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले होते, तर यंदा ५०० रुपयांची वाढ करून २४ हजार ५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले असून ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महापालिका कर्मचारी वर्षभर शहराचा कारभार सुरळीत सुरू ठेवण्यासाठी रात्रंदिवस काम करतात, त्यामुळे त्यांच्या सेवेचा गौरव म्हणून महोत्सवाच्या निमित्ताने हे विशेष अनुदान देण्यात येत आहे.

या निर्णयामुळे ठाणे महापालिकेवर सुमारे २३ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे. 6 हजार 59 कायम कर्मचारी, 774 शिक्षण विभागाचे कर्मचारी, 1 हजार 400 परिवहन विभागाचे कायम कर्मचारी, थेट कंत्राटी कर्मचारी व इतर 988 कर्मचाऱ्यांना अनुदानाचा लाभ होणार आहे.

हा निर्णय जाहीर झाल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट उसळली असून सर्वांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

Source link

Loading

More From Author

गुजरातच्या राजकारणात मोठी उलथापालथ, मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांनी दिला सामूहिक राजीनामे, उद्या होणार नव्या मंत्रिमंडळाची शपथ

गुजरातच्या राजकारणात मोठी उलथापालथ, मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांनी दिला सामूहिक राजीनामे, उद्या होणार नव्या मंत्रिमंडळाची शपथ

कपिल शर्मा के कैफे पर तीसरी बार फायरिंग:  लॉरेंस गैंग की धमकी- गोली कहीं से भी आ सकती है; कनाडा में है कैप्स कैफे

कपिल शर्मा के कैफे पर तीसरी बार फायरिंग: लॉरेंस गैंग की धमकी- गोली कहीं से भी आ सकती है; कनाडा में है कैप्स कैफे