नांदेडमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार उघड; 10 सिलेंडर जप्त – तहलका टाइम्स न्यूज पोर्टल

नांदेडमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार उघड; 10 सिलेंडर जप्त – तहलका टाइम्स न्यूज पोर्टल



नांदेड : 17 मार्च : घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरचा बेकायदेशीर साठा करून चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाने कडक कारवाई सुरू केली आहे. पुरवठा विभागाने (प्रोथा विभाग) श्रीनगर परिसरात छापा टाकून 10 रिकामे गॅस सिलिंडर जप्त केले असून संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हनुमान मंदिर रोड, श्रीनगर भागातील रहिवासी मकसूद अहमद हा त्याच्या घरात बेकायदेशीरपणे घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडर साठवून त्याची जादा किमतीत विक्री करत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी राहुल कर्डेले व जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ.जगदीश बर्डीवाड, तहसीलदार संजय वरकड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने 12 मार्च 2026 रोजी सदर ठिकाणी अचानक छापा टाकला.झडतीदरम्यान पथकाला एकूण 10 रिकामे गॅस सिलिंडर सापडले. यामध्ये घरगुती वापरासाठी 7 सिलिंडर (HP-3, भारत गॅस-2, इंडियन-2) आणि 3 व्यावसायिक वापरासाठी (HP कंपनीचे) सिलिंडरचा समावेश आहे. अशा प्रकारे पंचांच्या उपस्थितीत एकूण 10 रिकामे सिलिंडर जप्त करण्यात आले.या प्रकरणी तपासणी अधिकारी रविंदर राठोड यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, जीवनावश्यक वस्तू कायदा, 1955 चे कलम 3 आणि 7 तसेच लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस ऑर्डर, 2000 मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. त्या आधारे संबंधित आरोपींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत निरीक्षक रविंदर राठोड, मुंजाभाऊ लोकरे, बालाप्रसाद विलकती, वेद नेश्वर घावट (जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय) यांच्यासह नवदीप जाधव, विश्वनाथ शिंदे यांनी विशेष भूमिका बजावली.व्यवस्थापनाला आवाहन:घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करून किंवा अवैध साठेबाजी करून सर्वसामान्यांची लूट करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ.जगदीश बर्डीवाड यांनी दिला आहे. अशा बेकायदेशीर कामांची माहिती मिळताच नागरिकांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.



Source link

Loading

More From Author

Pakistan: पाकिस्तान ने अफगानिस्तान में बरसाए बम, तालिबान का आरोप- काबुल के अस्पताल पर हवाई हमले में चार की मौत

Pakistan: पाकिस्तान ने अफगानिस्तान में बरसाए बम, तालिबान का आरोप- काबुल के अस्पताल पर हवाई हमले में चार की मौत

नांदेड महानगरपालिकेची पहिली सभा सर्वसाधारण गदारोळाने गाजली – तहलका टाईम्स न्यूज पोर्टल

नांदेड महानगरपालिकेची पहिली सभा सर्वसाधारण गदारोळाने गाजली – तहलका टाईम्स न्यूज पोर्टल