नांदेड (वारक ताश न्यूज) 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास पावडेवाडी गावात 21 वर्षीय रितेश पावडे याच्यावर काही लोकांनी वार करून हत्या केली होती. त्याच्या शरीरावर 12 ते 13 जखमा आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पावडेवाडी गावात राहणारा रितेश पावडे (21) हा काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास पावडेवाडी येथील आपल्या घरी गेला. त्याच्यासोबत आणखी दोन लोक होते. रितेश पावडेचे घर ऑक्सफर्ड शाळेपासून अवघ्या ५० मीटर अंतरावर आहे. त्याच्या पाठीमागून आलेल्या काही लोकांनी त्याच्यावर समोरून-मागून हल्ला करून त्याच्या अंगावर तलवारी व खंजीरने 12 ते 13 जखमा केल्या. त्याचा जागीच मृत्यू झाला.
काही महिन्यांपूर्वी रितेश पावडे याचे गावातील दगंबर उर्फ दीपू पावडे आणि भावकी यांच्याशी भांडण झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावेळी रितेश पावडे याने दीपू पावडे यांना मारहाण केली होती. एका अंदाजानुसार ही घटना 3 ते 4 जणांनी केली होती. भाग्यनगर पोलीस काल रात्रीपासून तांत्रिक सहाय्याने आरोपीचा पाठलाग करत आहेत.
![]()
