नांदेडसह राज्यभरातील सर्व नगर पालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी आता २१ डिसेंबर रोजी आहे

नांदेडसह राज्यभरातील सर्व नगर पालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी आता २१ डिसेंबर रोजी आहे



नांदेड : आज, मंगळवार, 2 डिसेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील 11 नगरपालिका व नगरपंचायतींसह राज्यातील विविध शहरांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया लिहिपर्यंत सुरू आहे. मात्र, या निवडणुकांचे निकाल आता उद्या (3 डिसेंबर) जाहीर होणार नाहीत. राज्यातील सर्व नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकांची मतमोजणी आणि निकाल २१ डिसेंबर रोजी एकाच वेळी जाहीर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.निवडणुकीची आचारसंहिता २० डिसेंबरपर्यंत लागू राहणार असून त्यादरम्यान कोणत्याही प्रकारचे एक्झिट पोल देण्यास मनाई असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. राज्यभरात आज २६४ अध्यक्ष आणि ६ हजार ४२ सदस्यांसाठी मतदान झाले. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार 2 डिसेंबरला मतदान होणार होते आणि मतमोजणी आणि 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार होता, मात्र काही ठिकाणी कोर्टात अपील झाल्यामुळे गुंतागुंत निर्माण झाली. त्यामुळे जेथे वाद झाला तेथे 20 डिसेंबर रोजी नव्याने मतदान घेण्याचे आणि 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार 24 नगरपरिषदांच्या 154 जागांसाठी आणि इतर 76 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तात्पुरत्या थांबवण्यात आल्या आहेत. या सर्व ब्लॉक केलेल्या जागांवर 20 डिसेंबरला मतदान होणार असून 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व नगर पालिका आणि नगर पंचायतींचे निकाल 21 डिसेंबरला एकाच वेळी जाहीर होणार आहेत.



Source link

Loading

More From Author

MPPSC का देने जा रहे हैं एग्जाम, तो इन टिप्स को कर लें फॉलो, पहले प्रयास में मिलेगी सफलता

MPPSC का देने जा रहे हैं एग्जाम, तो इन टिप्स को कर लें फॉलो, पहले प्रयास में मिलेगी सफलता

झारखंड में 10वीं पास युवाओं की बल्ले-बल्ले!  690 लोगों को यहां मिलेगी नौकरी

झारखंड में 10वीं पास युवाओं की बल्ले-बल्ले! 690 लोगों को यहां मिलेगी नौकरी