नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई, अवैध खंजीरासह तरुण अटक

नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई, अवैध खंजीरासह तरुण अटक

नांदेड : अवैध शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या तरुणावर नांदेड ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक करून त्याच्या ताब्यातून लोखंडी खंजीर जप्त केला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 1 मार्च 2026 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने नांदेड येथील चंदसिंग कॉर्नर, महिंद्रा शोरूमसमोर कारवाई केली. दरम्यान, एका संशयितास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून सुमारे १७ इंच लांबीचा लोखंडी खंजीर जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या खंजीरची किंमत सुमारे 200 रुपये आहे.

सागर सुनील पावले (२३ वर्षे, व्यवसाय मजूर, रा. बळीरामपूर, नांदेड) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात शस्त्र कायदा कलम 4/25 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नांदेड अविनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरु, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या कारवाईत पोलीस निरीक्षक ओमकांत चिचोलकर, संतोष जाधव, विष्णू कल्याणकर, गोवेंद्र सरमलवार यांनी सहभाग घेतला. यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Source link

Loading

More From Author

गुंडांना न डगमगता लक्ष्य करण्याची अमेरिकेची घोषणा, ‘दीर्घ युद्ध’च्या तयारीचा इराणचा दावा

गुंडांना न डगमगता लक्ष्य करण्याची अमेरिकेची घोषणा, ‘दीर्घ युद्ध’च्या तयारीचा इराणचा दावा

‘तेहरान पर हमले का आदेश दिया’, ट्रंप ने बताया- कैसे ईरान को न्यूक्लियर पावर नहीं बनने देंगे

‘तेहरान पर हमले का आदेश दिया’, ट्रंप ने बताया- कैसे ईरान को न्यूक्लियर पावर नहीं बनने देंगे