मुंबई : 3/नोव्हेंबर (वारक तास) दिवाळी संपल्यानंतर राज्यात थंडीची लाट जाणवते. मात्र, यंदा उशिरा झालेला मान्सून अद्यापही परतला नाही. परतीचा मान्सून राज्याच्या सीमेवर थांबला आहे. याशिवाय अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पुन्हा पावसाची शक्यता आहे. त्यामुळे यंदा हिवाळ्यात विलंब होण्याची शक्यता आहे.
यंदा राज्यात पावसाने पुनरागमन केल्याने मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. आता नोव्हेंबरमध्येही राज्यात पुन्हा पाऊस पडत आहे. बदलत्या हवामानामुळे राज्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अनेक जिल्ह्यांना पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आता नोव्हेंबर सुरू झाला आहे, थंडी दूरच, पण मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला असून सोमवारीही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र कायम असल्याने येत्या काही दिवसांत पावसाचे संकेत आहेत.
रविवारी मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. सोमवारीही मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहील.
नोव्हेंबर महिना सुरू झाला असला तरी अद्याप राज्यात थंडी जाणवलेली नाही. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे 6 नोव्हेंबरपर्यंत राज्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता असून, 6-8 नोव्हेंबरनंतर हवामान कोरडे आणि थंड होईल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे. यावर्षी लवकर पाऊस नोव्हेंबरपर्यंत टिकू शकतो. त्यामुळे थंडीचे आगमनही लांबणार आहे.
![]()
