नांदेड: १५/डिसेंबर. (न्यूज पेपर) नांदेड महापालिका निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. महापालिका निवडणुकीसाठी आठ सहायक जिल्हाधिकाऱ्यांची निवडणूक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर सात तहसीलदारांकडे सहायक निवडणूक निवडणूक अधिकाऱ्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. छत्रपती संभाजी नगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी हे आदेश जारी केले आहेत.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 20 प्रभागात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सहाय्यक जिल्हाधिकारी संजीव मोरे, संतोषी देवकुळे, अविनाश कांबळे, क्रांती डोंबे, स्वाती डाभरे, विलास नरोटे, प्रवीण मंगशेट्टी आणि डॉ. सचिन खलाल यांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
तसेच तहसीलदार विकास बेरादार, शंकर लाड, उषा अजपवार, धोंडिबा गायकवाड, रेणुका दास देवणीकर, धम्मप्रिया गायकवाड आणि सय्यद उमर सय्यद हुसेन यांची सहायक निवडणूक निवडणूक अधिकारी म्हणून विभागीय आयुक्तांनी नियुक्ती केली आहे.
![]()
