नांदेड : (तहलका न्यूज) : शहरातील सुप्रसिद्ध खेळाडू व गतिमान युवा नेते आमिर खान (लाला) यांच्या अखंड सामाजिक व राष्ट्रीय सेवेची दखल घेत त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नांदेडच्या “संघटन सचिव”पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही महत्वाची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्हा (शहर) अध्यक्ष श्री ओम प्रकाश पोखरणा यांनी जाहीर केली. पक्षाचे उपाध्यक्ष श्री साबीर चावश यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष श्री ओम प्रकाश पोखरणा यांनी आमिर लाला यांना अधिकृत नियुक्ती पत्र सुपूर्द केले. यावेळी त्यांनी आपल्या कौशल्याचा वापर करून पक्षाची धोरणे, विचार आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यात आमीर लाला मोलाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. शेवटी जिल्हाध्यक्ष व उपाध्यक्षांनी अमीर लाला यांना त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.
![]()


