बखई नगर 🙁 प्रतिनिधी) 19 फेब्रुवारी : नांदेड ते कॅनॉट या रस्त्यावर गुरुवारी दुपारी हृदयद्रावक अपघात झाला. पूनापट्टीजवळ कार-बाईकच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर परिसरात शोककळा पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पुनपाटीजवळ एमएच 26 बीएम 8894 क्रमांकाची मोटारसायकल आणि एमएच 26 सीपी 5080 क्रमांकाची कार यांच्यात भीषण टक्कर झाली. ही धडक इतकी भीषण होती की, मोटारसायकलस्वार गजानन लक्ष्मण पांचाळ (वय ३५) याचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेले शंकर पंडितराव सुरजय देशमुख हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नांदेडला नेण्यात येत होते, मात्र वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.अपघातग्रस्त कार तलाठी प्रकाश लक्ष्मण तोटेवाड यांची असून अपघाताच्या वेळी ते स्वतः कार चालवत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून कारवाई केली. माजी आमदार माधवराव पाटील ढवळगाव यांनीही अपघातस्थळी भेट देऊन मदतीसाठी पुढाकार घेतला. भक्तीनगर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.
![]()


