मुंबई/जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहेत. कधी सोने अचानक महाग होते तर कधी त्याची किंमत कमी होते. सध्याच्या परिस्थितीत इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे जागतिक बाजारात अनिश्चितता निर्माण झाली असून, त्याचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजारावरही झाला आहे.
वृत्तानुसार, इराण आणि इस्रायल एकमेकांवर क्षेपणास्त्रे डागत आहेत, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. अवघ्या एका दिवसात भारतातील सोन्याच्या दरात सुमारे 9 हजार रुपयांनी वाढ झाली आहे.
जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 1 लाख 73 हजार 40 रुपयांवर पोहोचला आहे. इराण-इस्रायल युद्धाची स्थिती कायम राहिल्यास सोने आणखी महाग होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. व्यापार क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत २५ हजार रुपये किंवा १५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, चांदीच्या दरातही लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. चांदीच्या भावात 20 ते 40 हजार रुपयांची वाढ होण्याचा अंदाज असताना, तीन लाख रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसांत सोन्याचा भाव 1 लाख 85 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.
बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सध्याची परिस्थिती पाहता लवकर निर्णय घेणे फायदेशीर ठरू शकते, कारण जागतिक तणावामुळे मौल्यवान धातूच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता नाही.
![]()
