ठाणे महानगरपालिकेची थकीत पाणीबिलांची वसुली, 100% दंड माफीची घोषणा
ठाणे (आफताब शेख)
पाणी बिल वसुली प्रभावी करण्यासाठी ठाणे महापालिकेने आक्रमक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत ज्या खातेदारांनी दीर्घकाळापासून पाण्याची बिले भरली नाहीत, त्यांचे पाणी कनेक्शन तोडणे, मीटर रूम सील करणे अशी कडक कारवाई करण्यात येत आहे.
महापालिकेच्या अखत्यारीतील घरगुती पाणी पुरवठा प्रकल्पांसाठी प्रशासकीय शुल्कात 100% सवलत म्हणजेच दंड आणि व्याजाची थकबाकी चालू वर्षाच्या मागणीसह एकरकमी भरल्यास पाणी देयके दिली जात आहेत. थकीत पाणी बिलावरील ही संपूर्ण सवलत पाहता नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा व थकबाकी त्वरित भरावी, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
थकबाकी असलेल्या खातेदारांवर तात्काळ जप्तीची कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याअंतर्गत पाण्याचे कनेक्शन तोडणे, मीटर रुम सील करणे, अवैध पंप जप्त करण्याची कारवाई करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी पाण्याची बिले वेळेवर भरावीत आणि कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई टाळावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
![]()
