नांदेड : (वार्ताहर) 13 मार्च : जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा अखंडित व नेहमीप्रमाणे सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे ‘पॅनिक बुकिंग’ (घाबरून अनावश्यक बुकिंग) करू नये. तसेच गॅस एजन्सीबाहेर अनावश्यक गर्दी करण्याची गरज नाही. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.घरगुती गॅसवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत आहेत. याबाबत नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास ते आपला संदेश जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्हॉट्सॲप चॅट बॉट या मोबाईल क्रमांक 8668223326 वर पाठवू शकतात.नांदेड जिल्ह्यात कोणी घरगुती गॅसचा गैरवापर करताना किंवा काळाबाजार करताना आढळून आल्यास वरील क्रमांकावर त्वरित तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
![]()


