
दिनांक : ७ नोव्हेंबर २०२५
नांदेड महानगरनां देड महानगराच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या उपाध्यक्षपदी नसीर हुसेन रुपाणी यांची निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीपत्राचे वितरण भाजप नांदेड महानगर जिल्हाध्यक्ष अमर राजूरकर आणि भाजप अल्पसंख्याक मोर्चा नांदेड महानगर जिल्हाध्यक्ष अन्नू भाई यांच्या हस्ते करण्यात आले.
या विशेष कार्यक्रमास भाजपचे उपाध्यक्ष विजय येवलेकर, विजय गंभीरे, शीतल खांदील,गुरदीप सिंग संधू,राज यादव, तौसीफ अहमद, अकबर पठाण तसेच सर्व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी नसीर हुसेन रुपाणी यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या नियुक्तीमुळे भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चात नवा उत्साह आणि ऊर्जा संचारली असून पक्ष संघटन अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
![]()
